सौजन्य... श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ, मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग, माहाराष्ट्र - 416630

Shri Devi Bhagawati Devasthan - श्री देवी भगवती देवस्थान

धर्मदाय नोंदणी क्र.: ए-23-सिंधुदुर्ग दि. 02/05/1985

फोन न.: 02364-203980 (पी.सी.ऒ)

श्री देवी भगवती देवस्थानDisclaimer

श्री देवी भगवती दर्शन

श्री देवी भगवती माहिती

देवस्थान कार्यकारिणी

श्री देवी भगवती उत्सव

श्री देव गांगो

श्री देवी अनभवणी

श्री देवी पावण

श्री देवी बायची

भक्त निवास

आवाहन

श्री देवी भगवती दर्शन


Top

श्री देवी भगवती माहिती

या गावची ग्रामदेवता देवी भगवती हे एक जागृत देवस्थान आहे. देवी भगवतीचा वरदहस्त या गावावर असल्याने हे गाव प्रसिद्धीस आले आहे. अगदी सागरी महामार्गाला लागूनच देवी भगवतीचे प्राचीन कौलारु देवालय आहे. देवीच्या सध्याची पाषाणमूर्तीची १८१० मध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. काळ्या पाषाणात सुंदर रेखीव कोरीव काम केलेली महिषासूर मर्दीनीच्या रूपात ४ फूट उंचीची मूर्ती असून बाजूला चांदीच्या पत्र्याचा सुंदर नक्षीकाम केलेला महिरप आहे. मूर्तीच्या एका हातात खड्ग, दुस-या हातात त्रिशुल, तिस-या हातात ढाल व चौथ्या हातात शंख असून ती महिषासूरावर पाय ठेवून उभी आहे. गाभा-यात मूर्ती उंचावर असल्याने बाहेरूनही भाविकांना दर्शन घेता येते. मंदिराच्या गाभा-यात एक शिवलिंग व गाभा-याबाहेर संकेताचा पाषाण आहे. देवीची आज्ञा घेतेवेळी त्यात पाषाणाचा उपयोग केला जातो. त्या पाषाणात देवतेचा अंश असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. तो पाषाण दहा किलो वजनाचा असून त्याास 'गुंडी' असे म्हषटले जाते. सोलापूर परिसरात तशा पाषाणाला 'गुंडा' असे संबोधन आहे. त्य पाषाणाच्या साह्याने देवीच्या मंदिरात कौलप्रसाद घेण्याचे काम तसेच न्यायनिवाडे करण्याचे काम नित्यनियमाने सुरू असतात. उत्सव काळात देवीचं स्नान झाल्यावर सकाळी देवीस वस्रलंकारांनी व कवडय़ाच्या माळेनं सजववल्यावर विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर देवीचं दर्शन व ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. उत्तरेला असलेल्या गोमुख व शिवस्थानामुळे या देवीला सोमसुत्री प्रदक्षिणा घालावा लागते. देवीची पालखीही तशीच फिरवली जाते.

देवीचे मंदिर प्रशस्त असून चार भागात विभागले आहे. मंदिराचं बांधकाम हेमांडपंथी असून गाभारा पुरातन पद्धतीप्रमाणे लाकडी गोलाकार खांबांवर कोरीव काम करून बांधण्यात आला आहे. दुस-या भागात आरती, पुराणे सांगितली जातात. तिस-या भागात पालखी ठेवतात तर चौथ्या भागात नृत्य, गोंधळ, कीर्तन- प्रवचन व अवसर काढणे आदी कार्यक्रम होतात. येथेच ग्रामसभा घेतली जाते. सभोवतालचा परिसर मजबूत दगडी चि-यांनी बांधून काढला आहे. मंदीरातील बहुतांशी बांधकाम हे लाकडी असून अतीशय सुबक कोरीवकाम या लाकडी बांधकामावर केलेले आहे. मंदीराचा एकूण परिसरच शांत आणि रमणीय असा आहे. मंदीराच्या मागच्या बाजुला एक बारमाही पाण्याचा झरा असून. येथे हात-पाय धुवूनच देवीच्या दर्शनाला जावे लागते. या झय्रापासून थोड्या अंतरावर महापुरुषाचे जागृत स्थान आहे. मंदीर परिसरात देवी अनभवनी, देवी पावणी, देवी बायची, देवी भावय, ब्राह्मणदेव, देव गिरावळ, देव गांगो व देव गायगरब ई. देवतांची स्थाने आहेत.

देवीचे वार्षीक उत्सव मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. एका आख्यायिकेनुसार, भगवती देवी काशीहून मुणगे येथील पाडावे कुटुंबियांच्या घरी वास्तव्याला आली होती म्हणून तिचे माहेर या गावातील पाडाव्यांच्या घरी आहे असे समजले जाते. त्यामुळे देवीची ओटी पाडावे यांच्याच घरी भरली जाते. उत्सव काळात, देवीचे स्नान झाल्यावर सकाळी देवीस वस्त्रालंकारांनी व कवड्यांच्या माळेने सजवतात व तिची विधिवत पूजा करतात. त्यानंतर देवीचे दर्शन व ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. देवी दर तीन वर्षांनी कारिवणे वाडीतील पाडावे यांच्या घरी माहेरपणाला येते. त्यासस देवीची 'माहेरस्वावरी' असे म्हघणतात. देवी दुसऱ्या दिवशी पूजाअर्चा, महानैवेद्य झाल्यावर वाजत-गाजत पुन्हा् मंदिराकडे निघते.

चैत्र महिन्यात देवीची एक महिना पालखी असते. त्यावेळी मंदिराच्या आवारात गुढी उभारली जाते. पालखीच्या वेळी बारा-पाचाच्या मानकऱ्यांच्या वसंतपूजा केल्या जातात. मंदिरात ज्येष्ठ महिन्यात देसरूढ काढण्याचा विधी असतो तर श्रावण महिन्यात दररोज श्रावणीपूजा केली जाते. मंदिरातील सर्व स्थळांना गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, त्रिपुरी पौर्णिमा व देव दिपावलीत दिव्यांनी सजवले जाते. देवीचा शिमगोत्सवात साजरा केला जाणारा उत्सव धुळवडीपर्यंत चालतो. नवरात्रोत्सवामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना होऊन रोज रात्री जागर करण्यात येतो.

देवीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे वार्षिक यात्रोत्सव होय. तो पौष पौर्णिमेस चालू होतो व पाच दिवस चालतो. यावेळी देवीचे गाभाय्रात जाऊन दर्शन घेता येते ईतर दिवशी फक्त पुजारीच गाभाय्रात जाऊ शकतात.देवीचा जत्रोत्सव दिनांक ११ जानेवारी पासुन १५ जानेवारी २०१७ पर्यंतअसणार आहे. जत्रेच्या कालावधीत दूरवरच्या गावातील भाविक देवीच्या दर्शनासाठी, नवस करण्या साठी - फेडण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी तेथे येतात. त्यातवेळी परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते. वार्षिक यात्रोत्सवात देवीची पूजा-अर्चा, दर्शन, ओट्या भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे, सायंकाळी गोंधळी गायन, संगीत भजने, प्रवचन व पुराणवाचन, देवीची आरती, पालखी मिरवणूक आणि किर्तन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. यात्रेच्या शेवटच्या रात्री लळीताच्या कार्यक्रमाने त्या शानदार सोहळ्याची सांगता केली जाते. मुंबईकर, माहेरवाशिणी बहुसंख्येने उपस्थित राहून देवीचे आशिर्वाद घेतात. त्या काळात गावात आनंदाचे वातावरण असते. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवला जातो. दूरवरच्या भाविकांची मंदिराच्या शेजारीच असलेल्या भक्तनिवासात राहण्याची सोय केली जाते. देवीचा डाळपस्वारीचा सोहळासुद्धा अविस्मरणीय असतो.

(उपरोक्त माहिती मुणगेगावाच्या हितचिंतकाकडून उपलब्ध झालेली आहे.)

Top

देवस्थान कार्यकारिणी
अ. क्र. पदाधिका-याचे नाव पदनाम संपर्क
1 श्री. दिलिप दिगंबर महाराज अध्यक्ष 9420305625
2 श्री. विष्णू क्रुष्णाजी पाध्ये उपाध्यक्ष  
3 श्री. दिलिपकुमार हरी महाजन सचिव  
4 श्री. अविनाश बाळलिंग गुरव सदस्य  
5 श्री. सुधीर तारानाथ पाडावे सदस्य  
6 श्री. गोविंद श्रीधर सावंत सदस्य  
7 श्री. लक्ष्मण गोविंद घाडी सदस्य  
8 श्री. दशरथ सोमा मुणगेकर सदस्य  
9 श्री. देवदत्त पांडुरंग पुजारे सदस्य  
10 श्री. धर्माजी अर्जुन आडकर सदस्य  
11 श्री. दिगंबर मधुकर पेडणेकर सदस्य  

Top

श्री देवी भगवती उत्सव
अ. क्र. उत्सवाचे नाव कालावधी

स्वरुप

भाविकांची
उपस्थिती
1 चैत्र पालखी
(वसंत पूजा)
1 महिना चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढी उभारुन पंचाग पुजन होते. रात्रौ 8 वाजता पालखी असते. यावेळी पहिल्या 15 दिवसात मानकरी वसंत पूजा करतात. प्रतिदीन
500
2 देवीची
माहेर स्वारी
2 दिवस अक्षय त्रुतीयेला श्री देवी भगवती माहेर स्वारीला बाहेर पडते. ती कारिवणेवाडी येथे श्री. पाडावे बंधू यांचेकडे जाते. रात्रौ सर्व भाविकांना जेवण असते व नंतर भजन, किर्तन व करमणुकीचे कार्यक्रम होतात. दुसरे दिवशी पुजा-अर्चा होऊन महा नैवेद्द दाखविला जातो. सर्वांना महाप्रसाद असतो. या कार्यक्रमाला सर्व पाडावे बंधू उपस्थित असतात. तसेच सकाळी ऒट्या भरणे नवस देणे वगैरे काम चालते. संध्याकाळी पडस्थळ घेऊन गा-हाणं करून देवी मंदिरात येणेस निघते. हा कार्यक्रम दर 3 वर्षांनी होतो. 40,000
3 भावय पौर्णिमा 1 दिवस श्री देवी भावय समोर आतुन पंचारत बाहेर आल्यावर चिखल करून लोक नाचतात व मशाल (चूड) पेटवून ती दांडा मारून विझवली जाते. 500
4 श्रावणमास
(रक्षाबंधन)
1 महिना या महिन्यात ब्राह्मणाचेहस्ते पुजा-अर्चा केली जाते. भाविकांचे अभिषेक वगैरे केले जातात. राखी पौर्णिमेला पोवत्यांची पुजा करून देवांना पोवती घातली जातात. प्रतिदीन
500
5 गणेश चतुर्थी 21 दिवस गणेश चतुर्थीला मंदिरात सार्वजनिक गणपती बसविला जातो. रोज पुजा नैवेद्द होतो. रात्रौ भजनांचा कार्यक्रम असतो. 21 व्या दिवशी मुर्तीचे विसर्जन केले जाते. सर्वपित्री अमवास्येला अवसर काढले जातात. प्रतिदीन
200
6 नवरात्रौत्सव 10 दिवस अश्विन शुक्ल प्रतिपदा ते विजयादशमी असा हा कार्यक्रम असतो. पुण्याहवाचन, चंडीकलश, स्थापन, देवतांचे आवाहन, दिप प्रज्वलन करून घट ठेवला जातो. रोज पाठ. रात्रौ आरती-मंत्रपुष्प भजने असा हा कार्यक्रम असतो. गावातील लोक 10 दिवस मंदिरात जागर करतात. नवमीला नवचंडीहवन, घट उठविणे, बलिदान, नैवेद्द व महाप्रसाद होतो. दशमीला देवीला नेसवून, अंगावर घालून ऒट्या भरण्याचे काम केले जाते. नंतर देवी सीमोल्लंघनाला निघते. सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो व नंतर मंदिरात येऊन अवसर काढून लोकांची पडस्थळे घेतली जातात. प्रतिदीन
1,500
7 कोजागिरी पौर्णिमा 1 दिवस कोजागिरीला महापुरुषाकडे अभिषेक नैवेद्द असतो. रात्रौ भजनाचा कार्यक्रम करतात. कोजागिरी पौर्णीमा ते त्रिपुरारी पौर्णीमा अशी एक महिना पालखी असते. 1,500
8 त्रिपुरारी पौर्णिमा 1 दिवस या दिवशी रात्रौ 12 नंतर टीपर साजरा केला जातो. सभोवार दिवे लावले जातात. त्रिपुरारी पौर्णिमा ते कार्तिक अमावस्या असा 15 दिवस जागर असतो व यालाच कुयीजागर असे म्हणतात. रात्रौ कुयीचे वारे व जापसाळ असतात. याच वेळी कार्तिक द्वादशीला तुलसी विवाह असतो. 1,500
9 देव दिपावली 15 दिवस यावेळी श्री देवी भगवतीला साडी नेसवून अलंकार घातले जातात. तसेच अनभवणी देवीलासुद्धा दागिने घातले जातात. नंतर ऒट्या भरणेचा कार्यक्रम होतो. त्यानंतर कुयीचे वारे होते व अवसर काढले जातात. लोकांची पडस्थळे घेतली जातात व संध्याकाळी दिवा आणणेसाठी बांबरवाडी येथे दिव्याच्या मळीत जाऊन दिवा तयार करून तेथून दिवा आणून तो मंदिरात नेऊन सर्व स्थळांना भेट दिली जाते व नंतर कार्यक्रम संपतो. 15,000
10 पौष पौर्णीमा   पौष चतुर्दशीला अवसर काढून उत्सवाची समज दिली जाते. नंतर कातरवेळी गा-हाणी केली जातात. पौर्णिमेला देवी नेसवून अलंकार घालून संपूर्ण गावाची ऒटी भरुन वार्षिक सुरु होते. ऒट्या भरणे, नवस करणे, नवस फेड करणे, प्रवचन, आरती, पालखी, किर्तन असा कार्यक्रम होतो. भजने पण केली जातात. पाचवे दिवशी पहाटे लळीत होते व सर्वांना प्रसाद देऊन उत्सवाची सांगता होते. प्रतिदीन
30,000
11 होलिकोत्सव
(शिमगा)
5 दिवस फाल्गुन पौर्णिमेला गावकरी जामा होऊन होळी आणली जाते. नंतर ती उभी करुन कवळ जाळून पुजा केली जाते. नंतर होळीला सर्वांचे नारळ दिले जातात. दुसरे दिवशीपासून रात्रौ रोंबाटे असतात. कवळ जाळले जाते व तमाशा, दशावतार, नाट्यप्रयोग असे क्रमाने 3 रात्री कार्यक्रम असतात. पाचवे दिवशी मांड सुरु करून होळीजवळ खेळे येतात. नंतर नवस फेडले जातात व नवीन केले जातात. नंतर सार्वजनिक गा-हाणे होऊन रोंबाटाना सुरुवात होते. मंदिराभोवती नाचत फिरुन मंदिरात येतात.नंतर आरती होऊन धुळ मारली जाते. जे नारळ व गुळ जमा होते त्याचा प्रसाद सर्व मंडळींना वाटणेत येतो. प्रतिदीन
10,000
12 डाळपस्वारी 4 दिवस श्री देवी भगवती दर 3 वर्षांनी डाळपस्वारीला बाहेर पडते. त्यावेळी पहिली वस्ती बांबरवाडी येथे बायची मंदीरमध्ये असते. व रात्रौ भजनाचा कार्यक्रम करतात. दुसरे दिवशी पुजा नैवेद्द व बायची देवीचा कौल घेतला जातो. नंतर जेवण होऊन पुढे स्वारीला सुरुवात होते. नंतर कारिवणेवाडी येथे ब्राह्मणदेव मंदिर येथे स्थिर. गुळपाणी नंतर लोकांची पडस्थळे घेऊन आडबंदर येथे रवाना. तेथे श्रीदेव चव्हाटा मंदीर येथे स्थिर. जेवण वगैरे आटोपून भजनाचा कार्यक्रम. दुसरे दिवशी अभिषेक, पुजा, नैवेद्द व पुढे चालू. तेथून समुद्रमार्गे आडवळ येथे श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिरामध्ये स्थिर. गुळ पाणी लोकांची पडस्थळे व पुढे चालू. असे भंडारवाडी मार्गे सडेवाडी येथे सीमा समजावणी तेथे स्थिर. गुळपाणी, पडस्थळे नंतर परत भंडारवाडी येथे येऊन कांबर मंदिर येथे वस्ती. दुसरे दिवशी तेथे नैवेद्द करून पडस्थळे घेऊन जांभळकी-झरी-मोरुल मार्गे पडस्थळे घेत तेली यांचे कडून श्री. पाध्ये यांचे घरी. तेथे चहापाणी गा-हाणे करून आईर देऊळवारी येथून मंदिरात दाखल. यावेळी मार्गात येणारी सर्व दैवते यांना त्यांचा लागभाग देऊन मंदिरात प्रवेश केला जातो. सर्व स्थळांच्या भेटी घेतल्या जातात. प्रतिदीन
20,000

Top

श्री देव गांगो

Top

श्री देवी अनभवणी

Top

श्री देवी पावणी

Top

श्री देवी बायची

Top

भक्त निवास
रहाण्याची उत्तम व्यवस्था

संपर्क: फोन नं. 02364-202101

खोल्यांची संख्या 12 (गरम पाण्याची व्यवस्था)

मोठा रुम रू. 600/-

कॉमन रुम रु. 300/-

अटॅच रुम रु. 400/-

Top

आवाहन
मंदिरात होणारे धर्मिक विधी:

पुजापाठ

अभिषेक

लघुरुद्र

होम-हवन

मुणगे गावकरी आणि इतर भक्तांसाठी वरिल धार्मिक विधी, संपर्क केल्यास, आपल्या सोईनुसारपण केले जातात.

धार्मिक विधी करण्यासाठी किंवा देणगी स्विकारण्यासाठी बॅंकांचे खातेसंबंधी माहिती खालीलप्रमाणे:-

खाते नाव: श्रीदेवी भगवती देवस्थान मुणगे

अ. क्र. बॅंकेचे नाव शाखेचे नाव खाते क्रमांक
1 सिंधुदुर्ग बॅंक मुणगे शाखा 058400000000001
2 बॅंक ऑफ महाराष्ट्र आचरा शाखा 60094868232
3 बॅंक ऑफ इंडिया आचरा शाखा 147210110002141
4 बॅंक ऑफ इंडिया मिठबांव शाखा 140710100003208
संस्थेतर्फे सामाजिक कार्य:
प्राथमिक-माध्यमिक शाळा व विद्दयालयातील 1 ते 3 क्रमांक मिळविलेल्या गुणवंत मुलांना बक्षिस वितरण.

Top