सौजन्य... श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ, मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग, माहाराष्ट्र - 416630

















Appeals  - आवाहने

आवाहने



















Disclaimer

ग्रामपंचायत

श्री देवी भगवती देवस्थान

श्री भगवती एज्युकेशन सोसायटी

श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ

श्री भगवती वाचनालय

माजी विद्द्यार्थी मंडळ

वाडीवार मंडळे

श्री देवी भगवती देवस्थान
मंदिरात होणारे धर्मिक विधी:

पुजापाठ

अभिषेक

लघुरुद्र

होम-हवन

मुणगे गावकरी आणि इतर भक्तांसाठी वरिल धार्मिक विधी, संपर्क केल्यास, आपल्या सोईनुसारपण केले जातात.

धार्मिक विधी करण्यासाठी किंवा देणगी स्विकारण्यासाठी बॅंकांचे खातेसंबंधी माहिती खालीलप्रमाणे:-

खाते नाव: श्रीदेवी भगवती देवस्थान मुणगे

अ. क्र. बॅंकेचे नाव शाखेचे नाव खाते क्रमांक
1 सिंधुदुर्ग बॅंक मुणगे शाखा 058400000000001
2 बॅंक ऑफ महाराष्ट्र आचरा शाखा 60094868232
3 बॅंक ऑफ इंडिया आचरा शाखा 147210110002141
4 बॅंक ऑफ इंडिया मिठबांव शाखा 140710100003208

Top

श्री भगवती एज्युकेशन सोसायटी

माननीय श्री. सुरेश गोविंद बांदेकर आणि आपणा सर्वांच्या खूप मोठ्या दातृत्वातून कनिष्ठ महाविद्यालयाची वास्तू उभी राहिलेली आहे. मात्र अद्याप कार्यशाळा आणि इतर विविध सुविधा याकरिता निधीची आवश्यकता आहे. शिवाय श्री भगवती हायस्कूलच्या इमारतीची दुरुद्ती देखील मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. हायस्कूल लगतच्या इमारती, ह. ना. महाजन सभागृह, विश्रांतीगृह, शौचालये अशी अनेक प्रकारची दुरुस्तीची कामे समोर आहेत. शाळेच्या मैदानांचा विकास, आवार भिंतीची दुरुस्ती अशा अनेक कामांकरिता निधीची आवश्यकता आहे.

अर्थात संस्थेने स्वत: निश्चितपणे काही निधीची तजवीज केलेली असली तरी या सर्व कामांचे स्वरूप पाहता केवळ संस्थेकडील निधी या कामी पुरेसा नाही. संस्थेवर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या दैनंदिन खर्चाची जबादारीदेखील असल्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय ही वाटचाल पूर्ण होऊ शकणार नाही.

देणगीदारांकरिता आवश्यक माहिती

कनिष्ठ महाविद्यालयास स्व. विणा सुरेश बांदेकर हिचे नांव देण्यात आले असून या इमारतीच्या वर्गखोल्या, कार्यशाळा, सभागृह, इत्यादी करिता वैयक्तिक अथवा ४ ते ५ जणांच्या समूहाने रु.४ अथवा ५ लाख देणगी दिल्यास त्यांच्या इच्छेनुसार सदर वर्गखोलीला अथवा सदनिकेस नाव देण्यात येईल. तसेच रु.५०००/- व त्याच्यापेक्षा जास्त देणगी देणा-या देणगीदारांची नावे विशेष फलकावर निर्देशित करण्यात येतील. तसेच शाळेच्या इमारत दुरुस्तीकरिता रु.५.००० पेक्षा जास्त देणगी देणा-या देणगीदारांची नावे देखील शाळेच्या इमारतीमध्ये निर्देशित करण्यात येतील.

देणगीदारांनी आपले धनादेश श्री भगवती एज्यूकेशन सोसायटी या नावे खालील पत्त्यावर पाठवावेत. तसेच धनादेश संस्थेच्या खालील बँक खात्यावर थेट जमा देखील करू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र – २०१७०८२२३८०
सारस्वत बँक - ०१०२००१०००४६२८०
देणगी, आयकर अधिनियम, १९६१ मधील कलम ८०-जी द्वारे करसवलतीस पात्र आहे.

Registration (under -80G) No. Kolha/ AA-11/ 80G/ 11/ 2/ 2008-09/ 1470
PAN No. AAFTS4619G
TAN No. KLPS07189A

देणगीकरिता संपर्क

श्री. देवदत्त पांडुरंग पुजारे,
व्यवस्थापक, श्री भगवती एज्युकेशन सोसायटी,
द्वारा : मुख्याध्यापक, श्री भगवती हायस्कूल,
मुणगे, ता.देवगड, जिसिंधुदुर्ग - पिन -४१६ ६३०

दूरध्वनी क्र. २३६४ २४६००५, ई मेल - sbhs123@gmail.com

Top

श्री भगवती वाचनालय

www.munage.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून समस्त मुणगेवासी हितचिंतक व वाचकांना असे आवाहन करतो की सदरहू वाचनालय हे ग्रामिण खेडेगावात असून वाचन संस्क्रुती वाढविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. हे सर्व करीत असताना शासनाच्या अटींना आधिन राहून सतत आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते.

तरी आम्हाला आपल्यासारख्या हितचिंतकांकडून विविध स्वरुपात देणगीची अपेक्षा आहे. देणगी ही रोख स्वरुपात, पुस्तक स्वरुपात किंवा गरजेच्या साधन सामुग्रीच्या स्वरुपात मिळाल्यास त्याची आपल्याला नितांत गरज आहे. साधन सामुग्रीच्या स्वरुपात संगणक संच, स्कॅनर, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, खुर्च्या, लोखंडी कपाट, टेबल या गरजेच्या वस्तू आहेत.

मुणगे गावाच्या या अमुल्य सामाजिक कामात आपला अमुल्य वाटा असावा म्हणून आपल्याला विनंती की आपली ऐच्छीक स्वरुपाची मदत आपण वाचनालयाच्या खालील वर्णनाच्या बॅंक खात्यामध्ये चेकच्या सहायाने किंवा ऑनलाईन ट्रांस्फर करून भरू शकता.

स्टेट बॅंक ऑफ इंडिया, देवगड शाखा,

खाते नं. 11328277630

आय.एफ.एस.सी. – SBIN0000275

सी.आय.एफ. नं. 81080770992.

Top