सौजन्य... श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ, मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग, माहाराष्ट्र - 416630

Our Munage Village - आपलं मुणगे गाव

मुणगे गावDisclaimer

मुणगे गावाची वेस - वेशीचे तीन दगड

उपलब्ध नाकाशे:
    सिंधुदुर्ग जिल्ह्याचा   देवगड तालुक्याचा मुणगे गावाचा

देशातील गावसंख्या

सिंधुदुर्ग भौगोलिक माहिती

देवगड व परिसरातील महसूली गावे

मुणगे गावाची माहिती

मुणगे जनसंख्या वगैरे माहिती

वाड्यांची नावे

गावातील मान्यवर व्यक्ती

शासकिय माहिती

देशातील गावसंख्या

आपला भारतदेश हा 6,38,596 खेडेगावांनी सम्रुद्ध आहे.

आपले माहाराष्ट्र राज्य हे 43,711 खेडेगावांनी सम्रुद्ध आहे.

आपला सिधुदुर्ग जिल्हा हा 529 खेडेगावांनी सम्रुद्ध आहे.

आपला देवगड तालुका हा 98 खेडेगावांनी सम्रुद्ध आहे.

Top

सिंधुदुर्ग भौगोलिक माहिती

सिंधुदुर्ग जिल्हा हा १५.३७ आणि १६.४० उत्तर अक्षवृत्त व ७३.१९ आणि ७४.१८ पूर्व रेखावृत्त या दरम्यान वसलेला आहे. याच्या पश्चिम किनाऱ्याला अरबी समुद्र तर पूर्वे कडे सह्याद्री पर्वतरांग असून एकूण क्षेत्रफळ ५२०७ चौ. किमी आहे. हा जिल्हा सुंदर समुद्र किनाऱ्याने, सुरम्य पर्वताने आणि प्राकृतिक तसेच नैसर्गिक सौंदर्याने सजलेला आहे. येथील उष्ण-कटिबंधीय फळे जसे की जगप्रसिद्ध हापूस (अल्फांसो) आंबा, काजू व जांभूळ इत्यादी साठी सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ जातो. तसेच या जिल्ह्यात ७ रेल्वे स्थानके असून १०३ किमी लांबीचा लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. हा जिल्हा गोवा आणि मुंबई या शहरांबरोबर उत्तम रस्ते व लोहमार्गाने जोडण्यात आलेला आहे.

भौगोलिक क्षेत्र :
उत्तर अक्षांश 15.37 ते 16.40
पूर्व रेखांश 73.19 ते 74.18
भौगोलिक क्षेत्रफळ - 5207 चौ.किमी.

हवामान :
किमान तापमान - 16.30 से.
कमाल तापमान - 33.80 से.

पर्जन्य
3,287 मिमी (सरासरी). सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पूर्ण ४ महिन्यांमध्ये पाउस असतो.

जिल्ह्यातील बहुतांश भाग हा दाट वर्षावनाने झाकला गेलेला आहे.आंबोली हा डोंगराळ प्रदेश असून जंगली मांजरे या रानटी प्राण्यांसाठी तसेच ससे,रानटी कोंबड्या व रानटी रेडे यांच्यासाठी उपयुक्त निवासस्थान आहे.जंगली रेडे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यातून अन्न पाण्याच्या शोधात येथयेतात.अलीकडेच कर्नाटकातील खानापूर जंगलातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा प्रवेश झाला आहे.इथे प्रथमच वस्त्तीच्या शोधात हत्तींनी प्रवेश केला.तिलारी येथील प्रमुख पाठबंधारे प्रकल्प हा घनदाट वर्षावनांचा प्रदेश असून हत्तींसाठी एक महत्वाचे स्थान बनले आहे.परंतु येथील स्थानिक लोकांना हत्तींमुळे झालेली पिंकाची नासधूस व वृक्षतोड यांचा सामना करावा.

Top

देवगड व परिसरातील महसूली गावे

देवगड तालुक्यातील गावे

मालवण तालुक्यातील गावे

कणकवली तालुक्यातील गावे

Top

मुणगे गावाची माहिती

देवगड आणि मालवण या दोन तालुक्यांच्या सीमेवर मुणगे गाव वसले आहे. देवगडपासून 30 किमी. आणि कुणकेश्वरपासून 16 किमी. अंतरावर मुणगे गाव आहे. कोकणातील सर्व वैशिष्टे मुणगे गावात अगदी भरभरुन पाहता येतात. म्हणजे हिरवेगार डोंगर, डोंगरात लपलेली कौलारु घरे, समुद्र किनारा, रानडुक्कर वाघ यांसारखे जंगली पशु, आंबे, रतांबे (कोकम), फणस, काजु, नारळ, पोफळीच्या बागा, करवंदांच्या झाळी, आणि अशा निसर्गरम्य परिसरात दिमाखात उभे असलेले ग्रामदेवतेचे मंदीर अशी एकंदरीत कोकणाला साजेशी सर्व वैशिष्ट्ये या गावात आहेत.

प्राचीन काळी या गावात ऋषीमुनीचे वास्तव्य होते म्हणून या गावाला मुनीग्राम असे म्हटले जायचे. कालांतराने मुनीग्रामचे अपभ्रंश होऊन मुणगे असे नाव रुढ झाले. या गावची ग्रामदेवता देवी भगवती हे एक जागृत देवस्थान आहे.

मुणगे गाव हे क्षेत्रफळाने तसे मोठे आहे. गावात १२ वाड्या असून त्या विस्तारलेल्या आहेत. काही वाड्या समुद्र किनारी असून काही डोंगराच्या कुशीत दुर्गम भागात तर काही माळरानावर कातळावर अशाप्रकारे गावचा विस्तार झालेला आहे. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती, व आंबा बागायती आहे तसेच समुद्र किनारा जवळ असलेल्या वाड्यांमध्ये पारंपारिक मासेमारी व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो. मुणगे गावात पर्यटनदृष्ट्या समृद्ध असे समुद्रकिनारे आहेत. देवी भगवतीच्या देवस्थानामुळे धार्मीक पर्यटनास ही येथे वाव आहे. गावात पर्यटकांची संख्या वाढती असून पर्यटकांच्या सोयीसाठी मंदीरानजीक भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. अशाप्रकारे नैसर्गिक विविधतेने नटलेले, तसेच देवी भगवतीच्या वास्तव्याने पावन झालेले मुणगे गाव हे देवगड तालुक्याचे भूषण आहे. आता या देवस्थानाला महाराष्ट्र शासनाचा 'ब' दर्जा प्राप्त झाला. आहे.

(उपरोक्त माहिती मुणगेगावाच्या हितचिंतकाकडून उपलब्ध झालेली आहे.)

मुणगे येथे पोहोचण्यासाठी:

45 कि.मि. अंतर, कणकवली रेल्वे स्टेशन ते मुणगे

43 कि.मि. अंतर, कणकवली एस.टी. डेपो ते मुणगे अंतर

35 कि.मि. अंतर, कणकवली ते आचरा (शेअर रिक्षा उपलब्ध)

8 कि.मि. अंतर, आचरा ते मुणगे

According to Census 2011 information the location code or village code of Munage village is 566330. Munage village is located in Devgad Tehsil of Sindhudurg district in Maharashtra, India. It is situated 30km away from sub-district headquarter Devgad and 60km away from district headquarter Oras Bk.. As per 2009 stats, Munge is the gram panchayat of Munage village.

In Munage village population of children with age 0-6 is 140 which makes up 7.43% of total population of village. Average Sex Ratio of Munage village is 1047 which is higher than Maharashtra state average of 929.

Munage village has higher literacy rate compared to Maharashtra. In 2011, literacy rate of Munage village was 89.39% compared to 82.34% of Maharashtra. In Munage Male literacy stands at 92.92% while female literacy rate was 86.03%.

As per constitution of India and Panchyati Raaj Act, Munage village is administrated by Sarpanch (Head of Village) who is elected representative of village.

Top

मुणगे जनसंख्या वगैरे माहिती
2011 च्या जनगणती प्रमाणै

As per Census 2011

ग्राम पंचायत
ताहासिल
डिस्ट्रिक्ट
राज्य
पिन कोड
क्षेत्रफळ
लोकसंख्या
घरसंख्या
जवळचे शहर

: मुणगे
: देवगड
: सिंधुदूर्ग
: महाराष्ट्र
: 416630
: 1200 हेक्टर्स
: 2,175
: 461
: मालवण (32 कि.मी.)

Gram Panchayat
Tehsil
District
State
Pin Code
Area
Population
Households
Nearest Town

: Munge
: Devgad
: Sindhudurg
: Maharashtra
: 416630
: 1200 hectares
: 2,175
: 461
: Malwan (32 km)

Top

वाड्यांची नावे
 

1. सडेवाडी

2. भंडारवाडी

3. सावंतवाडी

4. देऊळवाडी

5. बौध्दवाडी

6. लब्देवाडी

7. आडवळवाडी

8. आपईवाडी

9. आडबंदर

10. वाघोळीवाडी

11. कारिवणेवाडी

12. बांबरवाडी

Top

गावातील मान्यवर व्यक्ती

सन १९६६-६७ दरम्यान मुणगे गावात माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती. गावाच्या बाहेर जावून शिक्षण घेण्याची आर्थिक कुवत जवळपास बहुतांश ग्रामस्थांमध्ये नव्हती. अशावेळी मुणगे गावातील काही ग्रामस्थ स्व. शांताराम कृष्णाजी ऊर्फ बापूसाहेब पंतवालावलकर यांना भेटले व त्यांनी मुणगे गावातील शिक्षणाची समस्या त्यांना सांगितली.

स्व. बापूंचे मुळगाव मुणगे, आणि ग्रामदेवता श्री देवी भगवती. मा. बापूंनी हा श्री देवी भगवतीचा कृपा प्रसाद मानून मुणग्यातील ग्रामस्थांची हि विनंती स्वीकारली. अर्थात हे कार्य सर्वांच्या सहकार्याने व्हावं, अशी बापूंची मनोमन इच्छा असल्यामुळे या कार्यात त्यांनी ग्रामस्थांना देखील सहभागी करून घेतले. स्व. बापूंनी निधीचा मोठा भार स्वत: उचलला आणि ग्रामस्थांनी या निधीत यथाशक्ती आपले योगदान दिले.

Top

शासकिय माहिती

रक्त पेढी

जिल्ह्यातील बॅंका

शासकिय कार्यालयांचे फोन नंबर

नागरिकांची सनद

विविध प्रवर्गातील लाभार्थींसाठी योजना

ऒ.बी.सी. लाभार्थींसाठी योजन

शुभमंगल सामुहिक विवाह योजना

आपत्ती व्यवस्थापन

आपातकालीन सेवा

संपर्कासाठी एस.टी.डी. कोड खालिलप्रमाणे:

02362 - कुडाळ

02365 - मालवण

02363 - सावंतवाडी

02367 - कणकवली

02366 - वेंगुर्ला

02364 - देवगड

02363 - दोडामार्ग

02367 - वैभववाडी

   

Top