|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Shri Bhagawati Education Society
- श्री भगवती एज्युकेशन सोसायटी |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
श्री भगवती
एज्युकेशन सोसायटी, मुणगे मु. मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, पिन - ४१६ ६३०. (नोंदणी क्र. एफ – २५ - सिंधुदुर्ग, सन -१९६७) |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संपर्क- ०२३६४ २४६००५ Email – sbhs123@gmail.com |
PAN No.AAFTS4619G TAN No.KLPS07189A |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Registration (under -80G) No. Kolha/AA-11/80G/11/2/2008-09/1470 | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
स्थानिक देखरेख मंडळ – सन २०१६-१९ संस्थेचे उपक्रम:- स्व. वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ एम.सी.व्ही.सी. स्व. शांताराम कृष्णाजी पंतवालावलकर स्मृतिभवन |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
सुवर्ण महोत्सव - सांगता
सोहळा
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
स्व. शांताराम कृष्णाजी पंतवालावलकर आणि स्व. नलिनीताई शांताराम पंतवालावलकर सन १९६६-६७ दरम्यान मुणगे गावात माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती. गावाच्या बाहेर जावून शिक्षण घेण्याची आर्थिक कुवत जवळपास बहुतांश ग्रामस्थांमध्ये नव्हती. अशावेळी मुणगे गावातील काही ग्रामस्थ स्व. शांताराम कृष्णाजी ऊर्फ बापूसाहेब पंतवालावलकर यांना भेटले व त्यांनी मुणगे गावातील शिक्षणाची समस्या त्यांना सांगितली. स्व. बापूंचे मुळगाव मुणगे, आणि ग्रामदेवता श्री देवी भगवती. मा. बापूंनी हा श्री देवी भगवतीचा कृपा प्रसाद मानून मुणग्यातील ग्रामस्थांची हि विनंती स्वीकारली. अर्थात हे कार्य सर्वांच्या सहकार्याने व्हावं, अशी बापूंची मनोमन इच्छा असल्यामुळे या कार्यात त्यांनी ग्रामस्थांना देखील सहभागी करून घेतले. स्व. बापूंनी निधीचा मोठा भार स्वत: उचलला आणि ग्रामस्थांनी या निधीत यथाशक्ती आपले योगदान दिले. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संस्थेची स्थापना सन १९६६-६७ दरम्यान मुणगे गावात माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती. गावाच्या बाहेर जावून शिक्षण घेण्याची आर्थिक कुवत जवळपास बहुतांश ग्रामस्थांमध्ये नव्हती. अशावेळी मुणगे गावातील काही ग्रामस्थ स्व. शांताराम कृष्णाजी ऊर्फ बापूसाहेब पंतवालावलकर यांना भेटले व त्यांनी मुणगे गावातील शिक्षणाची समस्या त्यांना सांगितली. स्व. बापूंचे मुळगाव मुणगे, आणि ग्रामदेवता श्री देवी भगवती. मा. बापूंनी हा श्री देवी भगवतीचा कृपा प्रसाद मानून मुणग्यातील ग्रामस्थांची हि विनंती स्वीकारली. अर्थात हे कार्य सर्वांच्या सहकार्याने व्हावं, अशी बापूंची मनोमन इच्छा असल्यामुळे या कार्यात त्यांनी ग्रामस्थांना देखील सहभागी करून घेतले. स्व. बापूंनी निधीचा मोठा भार स्वत: उचलला आणि ग्रामस्थांनी या निधीत यथाशक्ती आपले योगदान दिले. अशाप्रकारे १९६७ साली संस्थेची स्थापना झाली आणि शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाले. अर्थात इमारतीकरिता आवश्यक असलेली जमीन मुणगे गावातील मुणगेकर, सावंत, महाजन बंधूंनी स्वखुशीने दिली. तीदेखील व्यवस्थितपणे बक्षीसपत्र वगैरे बाबींची पूर्तता करून. इमारतीकरिता दगड, माती देखील सावंत, दळवी, आडकर आणि करंदीकर कुटुंबीयांनी कोणतेही आर्थिक शुल्क न आकारता उपलबद्ध करून दिली. स्थानिक ग्रामस्थांनी यथाशक्ती श्रमदान देखील केले. या सर्वांच्या तन-मन-धन अर्पून केलेल्या सहभागामुळेच शाळेच्या इमारत उभारणीचे कार्य अवघ्या सहा-सात महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण झाले आणि श्री देवी भगवतीच्या शुभाशीर्वादाने मुणगेवासीयांचे स्वप्न साकार झाले. संस्थेची सभासद संख्या – ६५० आहे. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
कार्यकारिणी – सन २०१६-१९ | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
शालेय समिती – सन २०१६-१९ | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
स्थानिक देखरेख मंडळ – सन २०१६-१९ | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संस्थेचे उपक्रम
श्री
भगवती हायस्कूल
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संस्थेच्यावतीने चालविण्यात येणा-या विद्यालयात सद्यस्थितीत इ.५ वी ते १० वी या वर्गांमध्ये एकूण २१० विद्यार्थी शिक्षण घेत असून हे विद्यालय महाराष्ट्र शासनाचे अनुदानपात्र विद्यालय आहे. सुरुवातीपासून या विद्यालयात उत्तम व कुशाग्र शिक्षकांची परंपरा असल्यामुळे सर्व मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली आहे. या शाळेतील मुले मुंबईसारख्या शहरांमध्ये आज उच्च शिक्षण घेत आहेत. यापूर्वीच्या अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आज महत्वाच्या पदांवर आपला ठसा उमटविलेला आहे. शाळेचा निकाल सातत्यपूर्ण आणि समाधानकारक आहे. शाळेचा अध्यापक व अध्यापकेतर वर्ग |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संस्थेचे उपक्रम
स्व. वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ एम.सी.व्ही.सी.
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
चाकोरीबद्ध शिक्षणामधून वेगळी वाट म्हणून व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचे संस्थेने ठरविले आणि आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष, मा. श्री. सुरेश गोविंद बांदेकर यांनी त्यांची कन्या स्व. वीणा हिच्या स्मरणार्थ कनिष्ठ महाविद्यालायाकरिता रुपये पंचवीस लाखाची देणगी संस्थेकडे सुपूर्द केली आणि सन २००९-१० पासून संस्थेने “स्व. वीणा सुरेश बांदेकर कनिष्ठ महाविद्यालय” सुरु केले. आज या कनिष्ठ महाविद्यालयात एकूण १२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयात तीन अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. १. Auto Engineering
Technician. सुरुवातीला कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग शाळेच्या इमारतीत भरविण्यात येत असत. अलीकडेच श्री. सुरेश गोविंद बांदेकर यांच्या रु.२५ लाख देणगीतून आणि अन्य ग्रामस्था-हितचिंतकांच्या आर्थिक सहकार्याने कनिष्ठ महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत उभारण्यात आलेली आहे. आज या इमारतीत सर्व वर्ग भरविण्यात येत आहेत. मात्र कार्यशाळांचे बांधकाम अद्याप बाकी आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचा अध्यापक व अध्यापकेतर वर्ग |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
या कनिष्ठ महाविद्यालयाला शासनाचे अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. अनुदान मिळविण्याकरिता आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु, ही बाब शासनाच्या अखत्यारीतील असल्यामुळे आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत या कनिष्ठ महाविद्यालयाचा खर्च संस्थेच्यावतीने आणि विद्यार्थ्यांकडून मिळणा-या शुल्कामधून करण्यात येत आहे. या महाविद्यालयाला मुणगे गाव आणि आसपासच्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. देवगड-मालवण तालुक्यात आणखी तीन-चार अशा प्रकारची कनिष्ठ महाविद्यालये असताना आपल्याकडील अभ्यासक्रमाना मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल सुरुवातीपासूनच अतिशय समाधानकारक राहिलेला आहे. कनिष्ठ महाविद्यालयाकरिता साधन-सामग्री मोठ्या प्रमाणावर आवश्यक असते. आम्ही प्रतिवर्षी टप्प्याटप्प्याने आर्थिक कुवतीनुसार साधन-सामग्री उपलब्द्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु, आर्थिकदृष्ट्या आमच्या प्रयत्नांना मर्यादा असल्यामुळे देणगीदारांनी याकरिता आर्थिक तसेच वस्तुरूपात सहकार्य करावे, अशी संस्थेची अपेक्षा आहे. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संस्थेचे उपक्रम वाचनालय | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
सद्यस्थितीत गावातील बहुतेक ग्रामस्थांकडे दैनंदिन वर्तमानपत्र येत असावीत. परन्तु, सन १९७०-१९८० च्या दशकात एवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. विद्यालयाच्या सुरुवातीच्या काळापासून संस्थेने विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता वाचनालय सुरु केलेले आहे. वाचन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असायला हवा. तेव्हाच आपला विकास होवू शकतो. शाळेतील शिक्षणातून आपण वाचायला शिकतो, परंतु त्या वाचनाचा फायदा आपले ज्ञान वाढविण्याकरिता करायचा असेल तर नव-नवीन पुस्तके, दैनंदिन वर्तमानपत्र याचे वाचन आवश्यक असते. मुलांना सुरुवातीपासून वाचनाची आवड निर्माण होण्याकरिता विद्यालयात सुसज्य वाचनालय सुरु केलेले आहे. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संस्थेचे उपक्रम संगणक विभाग | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
“संगणक” हे शिक्षणाचे नवीन साधन झालेले असून संगणक शिक्षणाशिवाय आपण आजच्या जीवनात परिपूर्ण होवू शकत नाही. भविष्यात नोकरी-व्यवसायात संगणक शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आमच्या शाळेचे विद्यार्थी यामुळे कुठे कमी पडू नयेत याकरिता शाळेत संगणक शिक्षण देण्यात येत आहे. शाळेचे माजी विद्यार्थी आणि उद्योजक श्री. नंदकुमार अनंत मुणगेकर यांनी संस्थेला संगणक भेट देवून या शिक्षणाचा श्रीगणेशा केलेला आहे. तदनंतर तत्कालीन खासदार आणि सद्याचे आपल्या देशाचे रेल्वे मंत्री मा. श्री. सुरेश प्रभू, माजी आमदार स्व. गुरुनाथ कुलकर्णी, एम.जी.टी. फाउंडेशन, मा. आमदार श्री. परशुराम उपरकर, स्व. नारायण शांताराम गोसावी विश्वस्त संस्थेचे श्री. शांताराम गोसावी, ब्लिस फाउंडेशन, श्री. जे. जे. जाधव आदींनी वेळोवेळी संगणक भेट देवून मोलाचे सहकार्य संस्थेला केलेले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडून “बिर्ला श्लोका एज्युकेट लिमिटेड आणि विजन इंडिया सोफ्टवेअर एक्स्पोर्ट लिमिटेड” यांच्या सहकार्याने “आय.सी.टी. योजना (टप्पा-३)” अंतर्गत विनामूल्य संगणक प्रयोगशाळेकरिता १० संगणक प्रशिक्षकासह प्राप्त झालेले आहेत. शिवाय महाराष्ट्र शासनाचे अधिकृत एमएस-सीआयटी (MS-CIT) हे संगणक प्रशिक्षण केंद्र देखील आपल्याकडे कार्यरत आहे. पालक आणि ग्रामस्थ यांनी आपल्या पाल्याला या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायला प्रवृत्त करावे. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संस्थेचे उपक्रम फलोद्यान | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
एकूण १८ एकर जमिनीत २५० आंब्याची झाडे लावण्यात आलेली आहेत. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने अलीकडेच दि.१९ जून २०१६ रोजी आणखी ५१ आंबा कलम याबागेत लावण्यात आलेली आहेत. वाढता देखभाल खर्च विचारात घेवून कलमबाग वर्ष २०१६-१७ पासून सहा वर्षाच्या कराराराने देण्यात आलेली आहे. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संस्थेचे उपक्रम इतर उपक्रम | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
आधुनिक तंत्रज्ञान संगणकाबरोबरच अध्ययनाची आधुनिक साधने – आकाशवाणी, दूरचित्रवाणी, डी.व्हि.डी.प्लेअर, १६ एम.एम.फिल्म प्रोजेक्टर, ओवरहेड प्रोजेक्टर, फिल्म स्ट्रिप्स, एपिस्कोप, आदी शैक्षणिक साधने देखील संस्थेने फार पूर्वीपासूनच उपलब्ध केलेली आहेत. शालाबाह्य परीक्षा स्पर्धात्मक युगात टिकाव धरण्याकरिता विद्यार्थी सर्वांगाने परिपूर्ण असणे गरजेचे आहे. याकरिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शालाबाह्य स्पर्धापरीक्षांना बसविण्यात येते. याकरिता त्यांना शाळेतील शिक्षकांतर्फे विशेष मार्गदर्शन करण्यात येते. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, बाल प्रबोधिनी, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, कोकण प्रज्ञाशोध परीक्षा, शासकीय चित्रकला परीक्षा, गणित अध्यापक मंडळ परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा अशा अनेक परीक्षांना विद्यार्थ्यांना बसविण्यात येते. सावित्रीबाई फुले विद्यार्थी मदत योजना देणगीदारांच्या सहकार्याने संस्थेच्यावतीने सावित्रीबाई फुले विद्यार्थी मदत योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेकरिता आर्थिक सहकार्य करणा-या सर्व देणगीदारांची संस्था ऋणी आहे. पारितोषिक निधी पारितोषिकामुळे मुलांचा अभ्यासाचा उत्साह वाढतो. स्पर्धात्मक वातावरणामुळे अभ्यासाची गोडी वाढते. पारितोषिक निधीची संकल्पना स्व. बापुंची असून त्यांनी स्वत: या निधीची सुरुवात केलेली आहे. आज संस्थेकडे रु.२,४३,१३७/- पारितोषिक निधी जमा आहे. या रकमेवरील व्याजातून विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येतात. मात्र, व्याजाचे दर सध्या कमी झालेले असल्यामुळे बक्षिसपात्र मुलांना मिळणारी रक्कम अल्प असते. सबब, देणगीदारानी किमान रु.५०००/- देणगी दिल्यास मुलांना समाधानकारक बक्षिस रक्कम देता येईल. यापूर्वी ज्या देणगीदारांनी रु.५०००/- पेक्षा कमी देणगी दिलेली आहे, त्यांनी आपल्या देणगीची रक्कम वाढवून संस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन देणगीदारांना करण्यात येत आहे. शिक्षक–पालक संघ सन १९९३ साली शिक्षक-पालक संघाची स्थापना करण्यात आलेली असून, पालकांचा सहभाग या उपक्रमाला चांगल्या प्रकारे मिळत आहे. या उपक्रमामुळे पालकांमध्ये जागरुकता आलेली असून, नियमितपणे पालकसभेला उपस्थित राहणा-या पालकांच्या पाल्यांची अभ्यासातील प्रगती समाधानकारक होत आहे. पालक स्वत: शाळेत येऊन त्यांच्या पाल्ल्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेत असल्यामुळे विद्यार्थांमध्ये अभ्यासाची प्रवृत्ती वाढलेली आहे. सहशालेय उपक्रम स्व. बापूंच्या जन्मदिनी दरवर्षी दि. ४ जानेवारी रोजी शाळेत स्नेहसंमेलन साजरे करण्यात येते. शालेय परितोषिक वितरण, विद्यार्थ्यांचे विविध करमणुकीचे कार्यक्रम आदी उपक्रम यादिवशी राबविण्यात येतात. या उपक्रमामध्ये शाळेतील मुलांबरोबरच पालक आणि ग्रामस्थांचा सहभाग असतो. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारे एक व्यासपिठ उपलब्ध झालेले आहे. क्रीडा स्पर्धा मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध मैदानी तसेच बैठ्या खेळांना संस्थेने नेहमीच प्रोत्साहन दिलेले आहे. याकरिता आवश्यक असलेल्या मैदानांची उपलब्धता, विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता पुरेसा वेळ, या बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात येतो. मुणगे गावचे सुपुत्र- मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू- भारत नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि राज्यसभेचे माजी खासदार माननिय डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या खासदार निधीतून मैदानाचे नुतनीकरण करण्यात आलेले आहे. तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेण्याकरिता मार्गदर्शन करण्यात येते, प्रोत्साहन देण्यात येते. संस्थेची स्थावर मालमत्ता समाजसेवा आणि शिक्षणप्रसार हे संस्थेचे ध्येय असल्याने संस्थेने शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय, संगणक प्रशिक्षण, बापूंचे स्मृतीभवन या संस्थेच्या अंगीकृत उपक्रमांबरोबरच गावाकरिता आरोग्य केंद्र, पाणी व्यवस्था यामध्ये योगदान दिलेले आहे. शिवाय विश्रांतीगृह, नाट्य रंगमंच, वाचनालय, बचत हॉल, ह. ना. महाजन सभागृह, मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, विहीर, क्रीडांगण, कलमबाग असे विविध उपक्रम राबविलेले आहेत. या सर्व मिळकतीची धर्मादाय आयुक्तांच्या दफ्तरी नोंद करण्यात आलेली आहे. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
देणगीदारांना आवाहन | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
माननीय श्री. सुरेश गोविंद बांदेकर आणि आपणा सर्वांच्या खूप मोठ्या दातृत्वातून कनिष्ठ महाविद्यालयाची वास्तू उभी राहिलेली आहे. मात्र अद्याप कार्यशाळा आणि इतर विविध सुविधा याकरिता निधीची आवश्यकता आहे. शिवाय श्री भगवती हायस्कूलच्या इमारतीची दुरुद्ती देखील मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. हायस्कूल लगतच्या इमारती, ह. ना. महाजन सभागृह, विश्रांतीगृह, शौचालये अशी अनेक प्रकारची दुरुस्तीची कामे समोर आहेत. शाळेच्या मैदानांचा विकास, आवार भिंतीची दुरुस्ती अशा अनेक कामांकरिता निधीची आवश्यकता आहे. अर्थात संस्थेने स्वत: निश्चितपणे काही निधीची तजवीज केलेली असली तरी या सर्व कामांचे स्वरूप पाहता केवळ संस्थेकडील निधी या कामी पुरेसा नाही. संस्थेवर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या दैनंदिन खर्चाची जबादारीदेखील असल्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय ही वाटचाल पूर्ण होऊ शकणार नाही. देणगीदारांकरिता आवश्यक माहिती कनिष्ठ महाविद्यालयास स्व. विणा सुरेश बांदेकर हिचे नांव देण्यात आले असून या इमारतीच्या वर्गखोल्या, कार्यशाळा, सभागृह, इत्यादी करिता वैयक्तिक अथवा ४ ते ५ जणांच्या समूहाने रु.४ अथवा ५ लाख देणगी दिल्यास त्यांच्या इच्छेनुसार सदर वर्गखोलीला अथवा सदनिकेस नाव देण्यात येईल. तसेच रु.५०००/- व त्याच्यापेक्षा जास्त देणगी देणा-या देणगीदारांची नावे विशेष फलकावर निर्देशित करण्यात येतील. तसेच शाळेच्या इमारत दुरुस्तीकरिता रु.५.००० पेक्षा जास्त देणगी देणा-या देणगीदारांची नावे देखील शाळेच्या इमारतीमध्ये निर्देशित करण्यात येतील. देणगीदारांनी आपले धनादेश श्री भगवती एज्यूकेशन सोसायटी या नावे खालील पत्त्यावर पाठवावेत. तसेच धनादेश संस्थेच्या खालील बँक खात्यावर थेट जमा देखील करू शकता. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
बँक ऑफ महाराष्ट्र – २०१७०८२२३८० सारस्वत बँक - ०१०२००१०००४६२८० |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
देणगी, आयकर अधिनियम, १९६१ मधील कलम ८०-जी द्वारे करसवलतीस
पात्र आहे. Registration (under -80G)
No. Kolha/ AA-11/ 80G/ 11/ 2/ 2008-09/ 1470 |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
देणगीकरिता संपर्क
श्री. देवदत्त पांडुरंग पुजारे,
दूरध्वनी क्र. २३६४ २४६००५, ई मेल - sbhs123@gmail.com |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||