|
|
Smruti Bhavan - स्म्रुतीभवन |
|
स्व. बापूंनी स्थापन केलेल्या संस्थेला आज ५० वर्षं पूर्ण होत आहेत. या संस्थेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आज यशस्वी वाटचाल करीत आहेत. यापैकी अनेकजण स्वत:च्या कौटुंबिक जबाबदारीबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील आपले योगदान देत आहेत. अशा असंख्य माजी विद्यार्थ्यांनी आणि गावातील ग्रामस्थ तसेच हितचिंतकांच्या योगदानातून आज मुणगे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी स्व. बापूंची आठवण म्हणून संस्थेच्या वतीने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात –सन-२००८- स्व. शांताराम कृष्णाजी पंतवालावलकर स्मृतिभवनाची उभारणी करण्यात आलेली आहे.
या स्मृतिभवन वास्तूत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., श्री भगवती वाचनालय अशी बहुपयोगी कार्यालये कार्यरत असून मुणगे गावातील ग्रामस्थांना या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुविधांचा लाभ सहजसाध्य झालेला आहे. या स्मृतीभवनाच्या माध्यमातून स्व. बापूंची आठवण चिरंतन झालेली आहे.
|