|
||||||||||||||||||||||||||||||
|
||||||||||||||||||||||||||||||
Shri Devi Bhagwati Library - श्री देवी भगवती वाचनालय श्री देवी भगवती वाचनालय दुरध्वनी क्र. 02364-246123 वाचनालयाची वेळ:- सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 2-30 ते संध्याकाळी 5-30 (साप्ताहिक सुट्टी – रविवार) |
||||||||||||||||||||||||||||||
श्री भगवती वाचनालयात येणारी नियतकालिके श्री भगवती वाचनालयाचे कार्यकारी मंडळ |
||||||||||||||||||||||||||||||
|
||||||||||||||||||||||||||||||
श्री भगवती वाचनालयाबद्दल | ||||||||||||||||||||||||||||||
श्री भगवती वाचनालयाची स्थापना, 42 वर्षांपुर्वी, दि. 14 सप्टेंबर 1975 रोजी झाली. श्री भगवती हायस्कूलचे माजी शिक्षक कै. मनोहर गुंडोपंत कुलकर्णी यांनी 100 पुस्तकांच्या सहाय्याने सुरुवात केली. संस्था नोंदणी क्र. ई/162/सिंधुदुर्ग असून त्याला शासन मान्यता सन. 1977-78 ला मिळाली. 1979-80 या शैक्षणिक वर्षात वाचनालयाला शासकीय मान्यता मिळून (ड) वर्ग प्राप्त झाला. पुढे एकाच वर्षात म्हणजे 1980-81 मध्ये, पुस्तकांमध्ये वाढ झाल्याने वाचनालयास (क) वर्ग प्राप्त झाला. सध्या वाचनालयातील पुस्तक संख्या दहा हाजारांच्या (10172) घरात असून प्रौढ व बाल सभासदांचाही उत्तम प्रतिसाद आहे. वाचनालयाचे वाचक सभासद 264 (वर्गणीदार), बालवाचक 60 व तहह्यात सभासद 45 आहेत. वाचनालयातील विभाग:1. वाचन कक्ष, 2. बालविभाग, 3. संदर्भ विभाग व 4. महिला विभाग वाचनालयातील कर्मचारी:- 1. श्री. विश्वास शंकर मुणगेकर – ग्रंथपाल 2. श्री. सोमनाथ अशोक रुपे – शिपाई |
||||||||||||||||||||||||||||||
वाचनालयातील पुस्तक संख्या 10172 आणि खालील नियतकालिके | ||||||||||||||||||||||||||||||
|
||||||||||||||||||||||||||||||
श्री भगवती वाचनालयाचे कार्यकारी मंडळ | ||||||||||||||||||||||||||||||
|
||||||||||||||||||||||||||||||
श्री भगवती वाचनालयाचे इतर उपक्रम | ||||||||||||||||||||||||||||||
श्री भगवती वाचनालयाच्या उपक्रमाखाली दरवर्षी उत्तमोत्तम कार्यक्रम राबविले जातात. | ||||||||||||||||||||||||||||||
रक्तदान शिबीर चित्रकला स्पर्धा रंगभरण स्पर्धा वक्त्रुत्व स्पर्धा वाचन स्पर्धा महिलांचे हळदीकुंकू |
||||||||||||||||||||||||||||||
आवाहन | ||||||||||||||||||||||||||||||
www.munage.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून समस्त मुणगेवासी हितचिंतक व वाचकांना असे आवाहन करतो की सदरहू वाचनालय हे ग्रामिण खेडेगावात असून वाचन संस्क्रुती वाढविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. हे सर्व करीत असताना शासनाच्या अटींना आधिन राहून सतत आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. तरी आम्हाला आपल्यासारख्या हितचिंतकांकडून विविध स्वरुपात देणगीची अपेक्षा आहे. देणगी ही रोख स्वरुपात, पुस्तक स्वरुपात किंवा गरजेच्या साधन सामुग्रीच्या स्वरुपात मिळाल्यास त्याची आपल्याला नितांत गरज आहे. साधन सामुग्रीच्या स्वरुपात संगणक संच, स्कॅनर, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, खुर्च्या, लोखंडी कपाट, टेबल या गरजेच्या वस्तू आहेत. मुणगे गावाच्या या अमुल्य सामाजिक कामात आपला अमुल्य वाटा असावा म्हणून आपल्याला विनंती की आपली ऐच्छीक स्वरुपाची मदत आपण वाचनालयाच्या खालील वर्णनाच्या बॅंक खात्यामध्ये चेकच्या सहायाने किंवा ऑनलाईन ट्रांस्फर करून भरू शकता. |
||||||||||||||||||||||||||||||
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, देवगड शाखा, खाते नं. 11328277630 आय.एफ.एस.सी. – SBIN0000275 सी.आय.एफ. नं. 81080770992. |
||||||||||||||||||||||||||||||