सौजन्य... श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ, मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग, माहाराष्ट्र - 416630

श्री देवी भगवती यात्रोत्सव

प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षी, पौष पौर्णिमेला, शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२३ ते दि. १० जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये श्री देवी भगवतीचा यात्रौत्सव साजरा होत आहे. श्री देवी भगवतीला वस्त्रालंकाराने सजवून गावाची ओटी भरून यात्रा उत्सवाची सुरुवात होईल. ओट्या भरणे, प्रवचन, आरती, भजन, कीर्तन असे विविध कार्यक्रम ५ दिवस असणार आहेत. गावोगावीचे व्यापारी आपली दुकाने यात्रौत्सवात थाटतात. दररोज रात्री पालखी निघते. यात्रा कालावधीत मंदिर परिसरात भक्तांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. संपूर्ण परिसर भक्तीमय झालेला असतो. पाचव्या दिवशी पहाटे लळीत कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते.
यात्रौत्सावाकरिता सर्व भक्तांना आग्रहाचे निमंत्रण !
सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत !

चला तर, येताय ना!